Posts

Showing posts from December, 2024

लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार ! डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे सोबतच मिळणार, ‘या’ तारखेला खात्यात येणार रक्कम

Image
 राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हफ्त्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला होता. ते या हफ्त्याचे पैसे कधी येणार याची वाट पाहत होते. अखेर त्यांची ही प्रतीक्षा आता संपणार आहे.कारण संक्रांतीआधी फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन्ही हफ्ते सक्रांतीआधी लाडक्या बहिणींना मिळणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांतीआधी ३००० हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये ही योजना महायुतीसाठी खूपच फायदेशीर ठरली. जुलै महिन्यापासून राज्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना पैसे मिळत आहेत. जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंत ५ महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींना मिळाला आहेत. लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत ७५०० रुपये जमा झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आ चारसंहितेमुळे नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता आधीच देण्यात आला होता. आता डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याच्या पैशांची लाडक्या बहिणी वाट...

पीक विमा योजनेत हेराफेरी; नगर जिल्ह्यातील २३३ शेतकऱ्यांचे विमा अर्ज रद्द

Image
  पीक विमा योजनेत हेराफेरी; नगर जिल्ह्यातील २३३ शेतकऱ्यांचे विमा अर्ज रद्द पारनेर : पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजनेत पारनेर तालुक्यातही हेराफेरी झालेली आहे. या योजनेतील १५६ शेतकऱ्यांनी फळबागेची लागवड नसतानाही फळबागेचा विमा उतरविल्याचे, तर ६७ शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात लागवडीपेक्षा अधिक विमा घेतला असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे तालुक्यातील या २२३ शेतकऱ्यांचे विमा अर्ज रद्द करण्यात आले आहेत.पीक नसताना कांदा पिकाचा पीक विमा जिल्ह्यातील अनेक तालुक्यात उतरविल्याचे तपासणीत उघड झाले होते. त्यानंतर कृषी विभागाच्या वतीने फळबाग लागवडीचा विमा घेतलेल्या शेतकऱ्यांच्या फळबागांची तपासणी केली होती. त्यातही प्रत्यक्षात लागवड नसताना फळबागेचा विमा उतरविणे, तसेच लागवडीपेक्षा अधिक क्षेत्राचा विमा उतरविल्याचे कृषी विभागाच्या तपासणी पथकास दिसून आले आहे. कृषी विभागाच्या तपासणी पथकाने प्रत्यक्षात स्थळ पाहणी केली असता तालुक्यातील १५६ शेतकऱ्यांनी फळबाग नसतानाही ७२.१९ हेक्टर क्षेत्रावरील फळबागेचा विमा उतरविला असल्याचे उघड झाले आहे.तसेच ६७ शेतकऱ्यांनी आपण लावलेल्या क्षेत्रापेक्षा ५२.९४ हेक्टर क्षे...