Posts

Showing posts from June, 2024

“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना”

Image
 “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना ” आज महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना घोषित केली आहे, यामध्ये रुपये १५००/- महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. हि योजना १ जुलै २०२४ पासून चालू होणार आहे. सादर योजना महाराष्ट्र शासन महिला व बालकल्याण विभागाअंतर्ग राबवल्या जाणार आहे.  ■ राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण योजना  • आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांच्या बँक खात्यात प्रतिमहिना जमा होणार १५०० रूपये वयोमर्यादा २१ ते ६० योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत:- (१) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज. (२) लाभार्थ्याचे आधार कार्ड. (३) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. (४) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य). (५) बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाच...

नविन मतदार नाव नोंदणी

Image
 18 वर्ष पूर्ण झालेले आहे त्यांनी लवकर नाव नोंदणी करा. दिनांक  २५ जून २०२४ ते २५ जुलै २०२४ या दरम्यान मतदारांसाठी नवीन नाव नोंदणी, नाव व पत्ता दुरुस्ती, फोटो बदलणे, मतदारसंघ बदलणे, मयत व्यक्तीचे नाव कमी करणे मोबाईल नंबर अपडेट करणे, नवीन मतदान कार्ड  बनवणे या सर्व प्रकारच्या नोंदणी करण्याची मोहिम पुन्हा सुरु झाली आहे. फॉर्म-6 नविन नाव नोंदणीसाठी  फॉर्म- 6B आधार कार्ड हे मतदार कार्डला जोडण्यासाठी…. फॉर्म- 7 नाव कमी करण्यासाठी... फॉर्म-8 नाव दुरुस्ती, वय, पत्ता यातील चुक दुरुस्तीसाठी… आवश्यक कागदपत्रे पासपोर्ट साईज एक फोटो  वयाच पुरावा - शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स (यापैकी कोणताही एक पुरावा ) रहिवासी पुरावा- रेशन कार्ड, आधार कार्ड, लाईट बील, घरपट्टी पावती, बॅंक पासबुक (यापैकी कोणताही एक पुरावा) कुटुंबांमधील कोणत्याही एका व्यक्तीचे मतदान कार्ड  https://voters.eci.gov.in/  ,  https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen&pcampaignid=web_share