Posts

Showing posts from January, 2025

दिव्यांग (अपंग ) व्यक्तींना हरीत उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत वाटप योजना

Image
        राज्यातील दिव्यांग व्यक्तींना पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेची अंमलबजावणी संदर्भाने दिव्यांग अर्जदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्या करिता सदर नोंदणी पोर्टल हे दि. २२.०१.२०२५ सायं. ६.०० ते दि.०६.०२.२०२५ सायं. ६.०० वाजे पर्यंत उपलब्ध करून देण्यात आले आहे . योजनेच्या अटी व शर्ती 1) अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी  असावा 2) अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान ४०% टक्के असावे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक / सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्रधारक असावे 3) अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे UDID प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे 4) अर्जदार दि. ०१.०१.२०२५ या अहर्ता दिनांकाच्या दिवशी १८ ते ५५ या वयोगटातील अनावा 5) मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करण्यास सक्षम असतील 6) दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाख पेक्षा अधिक नसावे 7) लाभार्थी निवड करताना जास्त दिव्यांगत्व असलेल्यान प्रथम...

RTE Admission 2025-26 Application Form Open/ RTE प्रवेश प्रक्रिया 2025-26 सुरुवात येथे अर्ज करा.

Image
     सन २०२५-२६ या वर्षांसाठी  (RTE)  बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (सी) (१) नुसार   दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वंय अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा (विनाअनुदानीत) आणि महानगरपालिका शाळा (स्वंयअर्थसहाय्यित शाळा) शाळामध्ये आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पदधतीने राबविण्यात येत असून RTE प्रवेश प्रकीये अंतर्गत पात्र शाळांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. तरी सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी मुलाच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रीया  दि. १४-०१-२०२५ पासून सुरु होऊन  दि. २७-०१-२०२५ पर्यंत सुरु राहील.      मुलांना शाळामध्ये इयत्ता १ली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता पालकांनी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेत स्थळावर अर्ज भरण्याची सोय केली आहे.      अर्ज भरण्यासाठी लागणारे योग्य कागद पत्र जवळ ठेऊन आपल्या मुलांचा अर्ज पूर्ण करावा. अर्ज बिनचूक पूर्ण करावा. अर्ज करताना आपणास ज्या शाळ...

EPFO Pension: तुम्ही 10 वर्षे नोकरी केली तर किती पेन्शन मिळणार?

Image
अनेक खासगी कंपन्यांमधील कर्मचारी 58-60 वर्षांनी निवृत्त होतात आणि ईपीएफ पेन्शनचा लाभ घेतात. 10 वर्षे काम केल्यावरही तुम्हाला ईपीएस योजनेअंतर्गत मासिक पेन्शन मिळते. दरम्यान, तुमच्या पगारावरून दरमहा किती पेन्शन मिळेल ते समजून घ्या. EPFO Pension: तुम्ही 10 वर्षे नोकरी केली तर किती पेन्शन मिळणार?  अनेक खासगी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी हे वयाच्या 58 किंवा 60 व्या वर्षी निवृत्त होतात. या कर्मचाऱ्यांना ईपीएफचे पैसे देखील मिळतात. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांना पेन्शनच्या माध्यमातून ईपीएफचे पैसे मिळतात. अनेक जण आपल्या आयुष्यात फार कमी वर्षे नोकरी करतात आणि नंतर व्यवसायात किंवा इतर कामात गुंततात. अशा कर्मचाऱ्यांना नंतर 60 वर्षे वय झाल्यावर आपल्याला पीएफमधील पैशांमधून पेन्शन मिळणार का? असा प्रश्न पडू शकतो. तर अशा कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही एखाद्या कंपनीत 10 वर्षे जरी काम केलं असेल तर तुम्हाला निवृत्तीनंतर पेन्शन मिळेल. ईपीएफकडून ईपीएस पेन्शन स्कीमच्या माध्यमातून तुम्हाला निवृत्तीनंतर दर महिन्याला फिक्स पेन्शन मिळेल. या स्कीमच्या माध्यमातून तुम्हाला पेन्शन केव्...