“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना”

 “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना

आज महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना घोषित केली आहे, यामध्ये रुपये १५००/- महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. हि योजना १ जुलै २०२४ पासून चालू होणार आहे. सादर योजना महाराष्ट्र शासन महिला व बालकल्याण विभागाअंतर्ग राबवल्या जाणार आहे. 

■ राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण योजना 

• आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांच्या बँक खात्यात प्रतिमहिना जमा होणार १५०० रूपये

वयोमर्यादा २१ ते ६०

योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत:-

(१) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.

(२) लाभार्थ्याचे आधार कार्ड.

(३) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला.

(४) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला

(वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य).

(५) बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.

(६) पासपोर्ट आकाराचा फोटो.

(७) रेशनकार्ड.

(८) सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

🏷️🏷️ दाखल्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्राची यादी करिता 

 https://vanitacomputers.blogspot.com/2024/05/CAST%20CERTIFICAT.html


Comments

Popular posts from this blog

दाखल्यांसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांसाठी मोठा अपडेट ज्या लाभार्थ्यांना दिव्यांग, विधवा, श्रावणबाळ व वृद्ध पेन्शनचा लाभ मिळतो, त्यांनी हयातीचा दाखला (Life Certificate) ऑनलाइन काढणे अनिवार्य आहे.

जात पडताळणी प्रमाणपत्र