जात पडताळणी प्रमाणपत्र
आवश्यक कागदपत्रे ...
• संबंधित कॉलेजचे शिफारस पत्र व चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड व नमुना १५ A (अर्जावर संबंधित कॉलेजच्या प्राचार्यांची स्वाक्षरी, शिक्का शिवाय अर्जदाराचा फोटो)
• अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला / प्रवेश निर्गम उतारा
• अर्जदाराचा जातीचा दाखला झेरॉक्स प्रत
• अर्जदार वडिलांचा शाळेचा दाखला / प्रवेश निर्गमन उतारा व जातीचा दाखला, वडील
अशिक्षित असल्यास तसे शपथपत्र
• अर्जदाराची आत्या, चुलत्याचा शाळा सोडल्याचा दाखला
• अर्जदाराचे आजोबा किंवा चुलत आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला
• इतर महसुली पुरावे (गाव न. सात, टॅक्स पावती, खरेदीखत, सहा-ड, फेरफार उतारा, गहाणखत,
मालमत्तापत्रक)
• वंशावळ नमुना नं. तीन शपथपत्र व फॉर्म नं. १७ (शपथपत्र).
• अर्जदाराचा फोटो व स्वाक्षरी , मोबाईल नंबर , इमेल आयडी , आधार कार्ड
• पालकांची स्वाक्षरी
जात पडताळणी प्रमाणपत्र किती दिवसात मिळते?
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर अचूक कागदपत्रे असल्यास संबंधिताला जात पडताळणी समितीकडून १५ ते ९० दिवसांत हे प्रमाणपत्र ऑनलाइनच वितरित केले जाते.
( पुरावा - SC १०/०८/१९५० पूर्वीचा, ST ०६/०९/१९५० पूर्वीचा, NT/VT २१-११- १९६१ पूर्वीचा, OBC/ SBC - १३-१०-१९६७ पूर्वीचा )

Comments
Post a Comment