दिव्यांग (अपंग ) व्यक्तींना हरीत उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत वाटप योजना
राज्यातील दिव्यांग व्यक्तींना पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेची अंमलबजावणी संदर्भाने दिव्यांग अर्जदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्या करिता सदर नोंदणी पोर्टल हे दि. २२.०१.२०२५ सायं. ६.०० ते दि.०६.०२.२०२५ सायं. ६.०० वाजे पर्यंत उपलब्ध करून देण्यात आले आहे.
योजनेच्या अटी व शर्ती
1) अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा
2) अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे प्रमाण
किमान ४०% टक्के असावे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक / सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले
प्रमाणपत्रधारक असावे
3) अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे UDID प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे
4) अर्जदार दि. ०१.०१.२०२५ या अहर्ता दिनांकाच्या दिवशी १८ ते ५५ या वयोगटातील अनावा
5) मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करण्यास सक्षम असतील
6) दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाख पेक्षा अधिक नसावे
7) लाभार्थी निवड करताना जास्त दिव्यांगत्व असलेल्यान प्रथम प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे निवडीचाक्रमहा अतिती दिव्यांगत्व ते कमी दिव्यांगत्व या क्रमाने राहील. (शासन निर्चाय वाचा)
8) अतितीव्र दिव्यांगत्व असणाच्या दिव्यांग व्यक्तीस वाहन चालविण्याचा परवाना नाकारला असल्यास अशा परिस्थितीत देखील परवाना धारक नसलेल्या अतितीव्रं दिव्यांग व्यक्तीच्या बाबतीत नोबत्याच्या (Escort) सहाय्याने फिरता मोबाईल व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जाईल
9) अर्जाच्या वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधीत वाहनाची योग्यती काळजी घेण्याचे बंधपत्रनादर करणे आवश्यक राहील
10) जिल्हानिहाय लाभार्थ्यांची घोषणा दिव्यांगांच्या संख्येच्या प्रमाणात केली
11) अर्जदार हा शासकीय/निमशासकीय/मंडळे/महामंडळे यांचा कर्मचारी नसावा
12) या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार जर दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा कर्जदार असेल तरतो थकबाकीदार नसावा
13) राज्यातील इतर कोणत्याही योजने अंतर्गत मोफत ई-व्हेईकल प्राप्त झालेल्या दिव्यांग अर्जदारास सदर योजने अंतर्गत लाभ घेण्यास अपात्र ठरविण्यात येईल.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिये करिता आपण खालील दस्तऐवज
तयार ठेवणे आवश्यक आहे
1) अर्जदाराचा फोटो
2) अर्जदाराची सही
3) जातीचा दाखला
4) अधिवास प्रमाणपत्र / Domicile
5) निवासी पुरावा
6) दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र
7) UDID प्रमाणपत्र
8) ओळखपत्र
9) बँक पासबुकचे पहिले पान

AjayThroe5@gmail.com
ReplyDeleteजातीचा दाखला नसल्यास
ReplyDeleteओपन मध्ये फॉर्म भरावे
Delete