टायपिंग/शॉर्टहँड शिकलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत ₹६,५०० पर्यंतचा परीक्षा शुल्क परतावा (प्रोत्साहन भत्ता)

महाराष्ट्र सरकारची अमृत (AMRUT) योजना
(महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी)
खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना GCC-TBC टायपिंग/शॉर्टहँड परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ₹६,५०० पर्यंतचा परीक्षा शुल्क परतावा (प्रोत्साहन भत्ता) देते.
महत्त्वाची माहिती:
उद्देश: टायपिंग/शॉर्टहँड शिकलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे.
पात्रता : महाराष्ट्र रहिवासी, खुल्या प्रवर्गातील, आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS), जानेवारी २०२६ किंवा नंतर उत्तीर्ण झालेले.
आवश्यक कागदपत्रे :
१. आधार कार्ड,
२. रहिवासी दाखला,
३. १२वी उत्तीर्ण/डिप्लोमा गुणपत्रिका,
४. उत्पन्नाचा दाखला
५. (EWS)ई डब्लू एस प्रमाणपत्र ,
६. टायपिंग परीक्षा प्रमाणपत्र,
७. बँक पासबुक
ई-मेल आय डी
मोबाईल नंबर
मारवाडी, सिंधी, ब्राह्मण, गुजराती, पटेल, रजपूत, राजपुरोहित, अय्यंगार, बनिया, बंगाली, ठाकूर, हिंदू -नेपाली, नायडू, सेनगणथर, कानबी, भूमिहार, यलमार, त्यागी, जाट, नायर, कायस्थ, कम्मा, पाटीदार, कोमटी/ वैश्य ,लोहाना या जात प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लाभ घेता येईल.
Best service in ahilyanagar
ReplyDelete